नवी दिल्ली - केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाइडलाईन जारी केली आहे. यानुसार, ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो. मात्र, सर्वसामान्यपणे सरकारने कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा गॅप ठेवला आहे.
गाइडलाईनमध्ये म्हणण्यात आले आहे, की परदेशात जाण्यासाठी केवळ कोविशील्ड लस घेतलेल्यांनाच व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटवर पासपोर्ट नंबरचाही उल्लेख असेल. यासाठी भारताची दुसरी लस कोव्हॅक्सिन क्वालिफाय करत नाही.
केवळ विशेष श्रेणीतील लोकांनाच सूट -ही गाईडलाईन केवळ, 18 वर्षांवरील आणि 31 ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीच जारी करण्यात आलेली आहे. यात शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशात जाणारे लोक, टोकियो ओलिम्पिक्स गेम्समध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या स्टाफचा समावेश असेल.
सर्वसाधारणपणे कोविशील्डच्या दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांच्या गॅपचा नियम आहे. मात्र, या श्रेणीत परदेशात जाणाऱ्यांना लवकरही दुसरा डोस घेता येऊ शकतो. पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत की नाही, यावर अथॉरिटी लक्ष ठेवेल. यासंदर्भात लवकरच कोवीन प्लॅटफॉर्मवरही विशेष व्यवस्था बघायला मिळेल.
लसीकरणासाठी आता दिव्यांग फोटो ID ही चालणार - केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. लशीसाठी कुठल्याही पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी ओळखपत्र दिखवावे लागते. अशात अता दिव्यांग व्यक्ती यूडीआयडी दाखवून लसीकरणाचा लाभ घेऊ शकतात.