कोरोना व्हायरसच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. गुरुवार म्हणजेच 1 एप्रिलपासून देशातील कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. कोरोना लस आता 45 वर्षांपुढील नागरिकांना देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी फक्त तुम्हाला 45 वर्षे पूर्ण (Corona Vaccination for 45 years age) झाली म्हणून लस टोचली जाणार नाही तर यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. या जन्मतारखेपूर्वी तुमचा जन्म झाला असेल तरच तुम्हाला ही लस मिळणार आहे. (The government has set a cut-off date of January 1, 1977, for the next phase--any person born before this will be eligible for the vaccine from April 1. It is also making changes in the CoWIN platform.)
जन्मतारखेची अट काय....नोंदणी करण्यास जाण्यासाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 ला लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे 45 वर्षे व्हायला हवे. तसेच या नागरिकाचा जन्म 1 जानेवारी, 1977 आधी झालेला असायला हवा. जर तुमचा जन्म या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्हाला लस मिळणार आहे. काही दिवसांनी सरकार ही अट काढून टाकण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे.
16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले होते. तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरिअर्सना लस टोचली गेली. नंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती. यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती.
सर्टिफिकेट न मिळाल्यास काय...लस टोचलेल्याचे सर्टिफिकेट न मिळाल्यास 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देता येणार आहे. हे सर्टिफिकेट डिजिटलदेखील असणार आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासावेळी हे सर्टिफिकेट पाहिले जाणार आहे. अन्य ठिकाणीही हे सर्टिफिकेट लागू केले जाऊ शकते.
प्रत्येक घरात जाऊन लसीकरणासाठी विनंतीच नाहीमहाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करण्यासाठी कोणता प्रस्ताव ठेवलाय का असा सवाल आर. भूषण यांना करण्यात आला. भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनिझेषन आहे. परंतु यानंतरही डोअर टू डोअर लसीकरण होत नाही. महाराष्ट्रानं यासाठी कोणतीही विशेष विनंती केली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.