देशभरात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण (corona vaccination) करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत ४५ वर्षांवरील नागरिकांनाच पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याची बोंब असताना केंद्राने जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. अशातच केंद्र सरकारने आपण देत असलेली लस १८ ते ४५ वयोगटासाठी वापरता येणार नसल्याचे राज्यांना कळविले आहे. (vaccine given by the Centre cannot be used for the population below 45 years of age)महाराष्ट्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेककडे पत्र पाठवून १२ कोटी लसी लागणार असल्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, सीरमने राज्य सरकारला २० मे पर्यंत आपण एकही लस महाराष्ट्राला देऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे. या लसी केंद्र सरकारने आरक्षित केल्या असल्याने महाराष्ट्राला लस पुरवू शकत नाही, अशा शब्दांत सीरमने असमर्थता दर्शविली आहे. तप भारत बायोटेकने पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्राला केवळ ८६ लाख लसी पुरवू शकतो असे सांगितले आहे. ही परिस्थिती अन्य राज्यांची देखील आहे. यामुळे जरी १८ वरील वयोगटाला लसीकरण सुरु झाले तरी देखील लस उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.
Registration for Vaccine: कोरोना लसीसाठी रजिस्टर करताय? 18+ साठी सायंकाळी 'या' वेळेपासून सुरु होणार
यामुळे राज्यांनी केंद्राकडून लस आल्यास ती या वयोगटातील लोकांना देण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, केंद्र सरकारने आपण देत असलेली लस तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्यास मनाई केली आहे.
अतिरिक्त सचिव मनोहर आघानी यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात ही सूचना करण्यात आली आहे. कंपन्या जी लस बनवतील त्याचा ५० टक्के वाटा हा केंद्र सरकारचा आहे. ही लस राज्यांनाच दिली जाणार आहे. परंतू राज्यांनी ही लस ४५ वर्षांवरील आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच दिली पाहिजे. ही लस १८ ते ४५ वर्षांखालील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात वापरता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतेही शुल्क न आकारता राज्यांना १५ कोटी लसी पुरविल्या आहेत.