शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Corona vaccination: आतापर्यंत किती खासदारांनी घेतली नाही कोरोनावरील लस, धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 6:45 PM

Corona vaccination in India: सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या संसदेतील खासदारांपैकी किती जणांनी आतापर्यंत कोरोनाविरोधातील लस घेतली आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. (Corona vaccination) देशभरात आतापर्यंत ३२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी आवाहन करणाऱ्या संसदेतील खासदारांपैकी किती जणांनी आतापर्यंत कोरोनाविरोधातील लस घेतली आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे. ( How many MPs have not taken the corona vaccine so far? Shocking information came to the fore)

हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे १९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही सभागृहामधील खासदारांनी कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस घ्यावेत, अशी राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयाची अपेक्षा आहे.

दरम्यान, संसदेतील दोन्ही सभागृहांनी गोळा केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यसभेतील १७९ खासदारांनी कोरोनाविरोधातील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ३९ खासदारांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ९ खासदारांनी कोरोनावरील लसीचा एकही डोस घेतलेला नाही. इतर पाच खासदार कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी लस घेतलेली नाही. लोकसभेतील आकडेवारीनुसार आतापर्यंत ३२० खासदारांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १२४ खासदारांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संसदेतील एकूण ९६ खासदारांनी आतापर्यंत कोरोनावरील लसीचा एकही डोस घेतलेला नाही, मात्र खासदारांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फ्रंटलाइन वर्कर्स आणि हेल्थकेअर वर्कर्सना लस दिली गेली. त्यानंतर केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या लोकांचे लसीकरण सुरू केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर मोदींनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस हा ८ एप्रिल रोजी घेतला होता. स्वत: मोदींनी कोरोनावरील लसीचे डोस घेण्याचे आवाहन मंत्री आणि खासदारांना केले होते.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाHealthआरोग्य