नवी दिल्ली - देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याने सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसोबतच सर्वसामान्यांनाहा मोठा दिलासा मिळाला आहे. (Corona vaccination in India) कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काही चुका होत असल्याचेही समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (A man in Bhopal claims that he received COVID19 vaccination certificate without taking a jab)
कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर लस न घेताच आपल्याला कोरोनाचे लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज आल्याचा दावा भोपाळमधील एका तरुणाने केला आहे. दिव्येश्वर जयवार असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती देताना या तरुणाने सांगितले की, मी २७ मे रोजी लसीकरणासाठी स्लॉट बुक केला होता. मात्र लसीकरणाला जाण्यापूर्वीच मला माझे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे असा मेसेज मोबाईलवर आला.