पाटणा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढलीदेखील आहे. मात्र काही लसीकरण केद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पाहायला मिळत आहे.कोरोनामुळे आयसीयूमध्ये सर्वाधिक मृत्यू कोणाचे? धक्कादायक आकडेवारी पाहून एम्सचे डॉक्टरही चक्रावले
एकाच दिवशी पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले. तर कुठे एकाच दिवशी एकाच व्यक्तीला एक डोस कोवशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. यानंतर आता बिहारच्या छपरामध्ये इंजेक्शनमध्ये लस भरताच सुई टोचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नर्सवर कारवाई करण्यात आली.
लसीकरणादरम्यान नर्स रिकामी इंजेक्शन टोचत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची पडताळणी केल्यास नर्सचा बेजबाबदारपणा समोर आला. त्यानंतर संबंधित नर्सला लसीकरण कार्यातून तातडीनं हटवण्यात आल्याची माहिती डीआयओ डॉ. अजय शर्मांनी दिली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या नर्सला नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांत नोटिशीला समाधाकारक उत्तर न दिल्यास तिच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
इंजेक्शनमध्ये लस न भरताच ते टोचण्यात आल्याची घटना छपरा शहराच्या वॉर्ड नंबर एकच्या उर्दू माध्यमिक शाळेतील लसीकरण केंद्रात घडली. बुधवारी लसीकरणादरम्यान एका नर्सनं रिकामी इंजेक्शन एका व्यक्तीला टोचलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लस घेण्यासाठी आलेल्या तरुणाचं नाव अजहर हुसैन होतं. त्याचा मित्र लसीकरणाचा व्हिडीओ चित्रित करत होता. त्यात नर्सचा बेजबाबदारपणा चित्रित झाला.