नवी दिल्ली : लसीकरण झालेल्या सर्वांचा दाेन वर्षांमध्येच मृत्यू हाेणार असल्याबाबत फाेटाेसह एक पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पाेस्ट खोटी असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे.फ्रान्समधील नाेबेल पुरस्कार विजेते ल्यूक माॅन्टेनियर यांचा दाखला देऊन ही पाेस्ट टाकण्यात आली हाेती. त्यात म्हटले लिहिले हाेते की, लसीकरण केलेल्यांचा २ वर्षांमध्ये मृत्यू हाेणार असून, ते वाचण्याची शक्यता नाही. पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकिंग टीमने या पाेस्टबाबत सखाेल माहिती घेतली. त्यानंतर ही पाेस्ट खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच त्यांनी ट्वीटही केले आहे.
Corona vaccination: लसीकरणानंतर मृत्यूबाबतची ‘ती’ पाेस्ट खोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 5:56 AM