कोरोनावर विजय मिळविण्यासाठी वेगवान लसीकरण हा एकमेव उपाय असून लस हे या लढाईतील महत्त्वाचे शस्त्र आहे. आता नवी लस येत आहे. सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर दिली आहे. या कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस केवळ ५०० रुपयांत मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नवीन लस : कोर्बेव्हॅक्स- वर उल्लेखलेल्या लसींमध्ये आणखी एक लसीचा समावेश होणार आहे.- त्या लसीचे नाव कोर्बेव्हॅक्स आहे.- हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई या कंपनीने ही लस तयार केली आहे.- केंद्र सरकारने कोर्बेव्हॅक्स लसीच्या ३० कोटी मात्रांची ऑर्डर या कंपनीकडे नोंदवली आहे.
या लसीचे महत्त्व काय?- लसीच्या निर्मितीला बायोलॉजिकल ई कंपनीने सुरुवात केली असून केंद्र सरकारने ३० कोटी लसमात्रांची ऑर्डर नोंदवली आहे. त्यामुळे १५ कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे.- लसीच्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांना केंद्र सरकारने पाठिंबा दिला. तसेच १५०० कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले आहे.- लसींचा तुटवडा देशात भासत असताना कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. कोरोनाविरोधातील लढाईत ही लस महत्त्वाची ठरेल, असा सरकारला विश्वास आहे.
कोर्बेव्हॅक्स आहे काय?- कोर्बेव्हॅक्स ही रिकॉम्बिनन्ट प्रोटिन सब-युनिट प्रकारची लस आहे. कोरोनाच्या स्पाइक प्रोटिन या विशिष्ट भागापासून तिची निर्मिती करण्यात आली आहे. - स्पाइक प्रोटिन विषाणूला शरीरात प्रवेश करण्यास मदत करतो जेणेकरून त्याची प्रतिकृती तयार होऊन आजार निर्माण होतो. परंतु फक्त प्रोटिनच शरीरात प्रवेश करू शकले तर त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. कारण विषाणू अनुपस्थित असतो.- लसीत असलेला स्पाइक प्रोटिन शरीरात इंजेक्ट केला की त्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे जेव्हा संसर्ग होतो तेव्हा स्पाइक प्रोटिन प्रतिरोध करतात. - हेपेटायटिस-बी लस तयार करण्यासाठी ही पद्धत गेल्या कित्येक वर्षांपासून वापरली जाते. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईत कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीत प्रथमच हा प्रयोग केला जाणार आहे.
देशात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या लसी- कोविशिल्ड (सीरम इन्स्टिट्यूट)- कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक आणि आयसीएमआर)- स्पुतनिक व्ही (रशिया)- येत्या एक-दोन महिन्यांत आणखी काही लसी बाजारात उपलब्ध होणार आहेत.
निर्मिती कुठे केली जात आहे- कोर्बेव्हॅक्सची निर्मिती हैदराबादेतील बायोलॉजिकल ई या हैदराबादस्थित कंपनीकडून केली जात आहे. मात्र, या लसीच्या निर्मितीची मुळे ह्यूस्टनस्थित बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन्स नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेतमध्ये सापडतात- या संस्थेत रिकॉम्बिनन्ट प्रोटिन लसीच्या निर्मितीवर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन्स नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेनेच बायोलॉजिकल ई कंपनीला प्रॉडक्शन सेल बँकेचा पुरवठा केला