शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Corona vaccination: उत्तर प्रदेशात २० जणांना पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 8:10 AM

Corona vaccination: उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे, तसेच लस घेतलेल्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लसी घेतल्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. आम्ही या २० जणांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत असे केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार व जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये हा प्रकार घडला. तेथील आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावकऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. त्यानंतर १४ मे रोजी हे लोक दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. पहिला डोस एका लसीचा व दुसरा डोस वेगळ्याच लसीचा दिल्याचे लक्षात आल्यावर या प्रकाराची चौकशी करण्यात आली.जगातील काही देशांत नागरिकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचे प्रयोग होत आहेत. लसींच्या तुटवड्यामुळेही असे प्रयोग होतात. मात्र, त्यासाठी योग्य पद्धतीने मानवी चाचण्या होतात. त्यातून ठोस निष्कर्ष काढले जातात व नंतरच सर्वसामान्य नागरिकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्याचे पाऊल उचलले जाते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशCorona vaccineकोरोनाची लस