नवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ४४ वयोगटासाठी कोविन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळता आली. मात्र, लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता सरकारने या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.
४८लाख लसींचे डोस तीन दिवसांत मिळणार देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे सद्य:स्थितीत कोरोनाप्रतिबंधक लसींचे १ कोटी ८० लाख डोस उपलब्ध असून, येत्या तीन दिवसांत सर्व राज्यांना लसींचे ४८ लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
म्हणून घेतला निर्णयऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही डोस शिल्लक राहू शकतात. अशा स्थितीत डोस वाया जाउ नये यासाठी थेट लसीकरण केंद्रांवर येणाऱ्यांना लस दिली जाउ शकते. मात्र, संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. त्याबाबत लसीकरण अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांमध्येच उपलब्ध राहणार आहे.सिडकोने पालघर नवीन शहर प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ३७७ हेक्टर क्षेत्रफळावर साकारणाऱ्या या नवीन शहराच्या उभारणीचे शाश्वत मॉडेल तयार केले जाणार आहे. त्यासाठी बाजाराचा कल, विकासाच्या संधी आदींबाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार आहेत.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
केंद्रांचा पुरवठा केंद्राने राज्यांना २१ कोटी ८० लाख डोस उपलब्ध करून दिले आहेत. वाया गेलेल्या लसींसह केंद्राने २३ मेपर्यंत २०,००,०८,८७५ डोसचा पुरवठा केला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
राज्यांकडे सद्य:स्थिती१,८०,४३,०१५ डोस उपलब्ध असून, येत्या तीन दिवसांत राज्यांना ४८,००,६५० डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.