शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 1:11 PM

Corona vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी कोरोना विषाणूची साथ आता काहीशी उतरणीला लागली आहे. दररोजच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट होऊन ती दीड लाखांपर्यंत खाली आली आहे. (Corona vaccination In India) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (When will all citizens of the country be vaccinated? The date stated by the Central Government in the Supreme Court)

या माहितीमधून केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण कधीपर्यंत होईल, याचे उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण होईल, अशी अपेक्षा आहे. लसीकरण धोरणामुळे सध्या केंद्र सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे.

भारतात मे महिन्यात कोरोनाच्या विरोधातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, काल देशात ३१ लाख ६४ हजार १६९  लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण २१ कोटी २० लाख ६६ हजार ६१४ जणांचे लसीकरण झाले आहे. 

दरम्यान, काल दिवसभरात भारतात कोरोनाचे १ लाख ५२ हजार ७३४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय