नवी दिल्ली – देशात १ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र लसीची तुटवडा कमी असल्याने अनेक राज्यात लसीकरण होणार नसल्याचं सांगितलं जातं आहे. महाराष्ट्रातही १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण होणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा १ कोटींहून अधिक लस उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
त्याचसोबत पुढील ३ दिवसात राज्यांना ५७ लाख ७० हजार लसीचे डोस उपलब्ध केले जातील. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्रालयाने याबाबतचा डेटा जारी केला आहे. त्यात सध्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे १ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच महाराष्ट्रात लसींचा साठी अपुरा असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहे. त्यावरदेखील केंद्रीय मंत्रालयाने भाष्य केले आहे. महाराष्ट्रात २८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ०.२२ टक्के खराब झालेल्या डोससह १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ लसीचे डोस दिले गेले आहेत. आताही राज्याकडे ५ लाखाहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राला ५ लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील असं केंद्राने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी ४ बिगर भाजपा शासित राज्यांनी १ मेपासून लसीकरण करण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं. लसींचा अभाव असल्याने लसीकरण कसं करायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने हा डेटा जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीला ३६ लाख ९० हजार लसीचे डोस दिले आहेत. त्यातील ३२ लाख ४३ हजार ३०० लसीच डोस संपलेत. आताही राज्याकडे ४ लाख ४७ हजार ४१० लसीचे डोस शिल्लक आहेत. आणि यापुढे दिड लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.
राजस्थानात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लस उपलब्ध केल्यात. आता त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यांना २ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० डोस दिलेत. त्यातील २ लाख ९२ हजार ८०८ डोस शिल्लक आहेत. तर ४ लाख आणखी डोस उपलब्ध करणार आहोत. छत्तीसगडमध्ये ५९ लाख १६ हजार ५५० लसीचे डोस दिलेत. त्यातील ३ लाख ३८ हजार ९६३ डोस शिल्लक आहेत. त्यांनाही २ लाख लसीचे डोस लवकरच दिले जातील असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.