Corona vaccination in India: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता देशवासीयांचं केंद्र सरकारतर्फे आजपासून मोफत लसीकरण केलं जाणार आहे. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग (Covid-19 vaccination) वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिली. अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये एका लसीकरण केंद्राचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते.
"पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व देशवासीयांचं लसीकरण करण्याचं आमचं ध्येय लवकरच गाठणार आहोत. केंद्र सरकारनं जुले आणि ऑगस्ट महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे," असं अमित शाह म्हणाले.
मोफत लसीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय"पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी १८ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे," असंही ते यावेळी म्हणाले. "सोमवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्तानं देशात सर्वाच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. भारत हा लसीकरणात आघाडीवर आहे. आम्ही सर्व देशवासीयांच्या लसीकरणाचं लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करू," असंही शाह यांनी स्पष्ट केलं.