नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,96,33,105 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,224 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2542 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,79,573 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. असं असताना एका ठिकाणी पेट्रोल चक्क मोफत देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोरोना लस घेणाऱ्यास या मोफत पेट्रोलचा लाभ मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या चायबासा जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
कोरोना लस घेणाऱ्यास एक लीटर पेट्रोल मोफत देण्यात आलं आहे. तसेच लस घेणाऱ्यास लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस देखील दिलं जात आहे. नागरिकांमधील कोरोनाची भीती घालवण्यासाठी अशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. महिला व बालविकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री जोबा मांझी यांनी सिंघभूमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचं उद्धाटन केलं आहे. प्रत्येक नागरिकाने कोरोना लस घेऊन स्वतःला कोरोनापासून सुरक्षित केलं पाहिजे. लसीकरणाबद्दलच्या अफवांकडे लक्ष देऊ नये असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा"
कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे, कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे, कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत.