शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Corona Vaccine: पुढील महिन्यात लहान मुलांसाठी कोरोना लस येणार; ICMR ची महत्वपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 8:26 PM

अलीकडेच काही दिवसांपूर्वी सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

ठळक मुद्देसीरमची Covavax ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लॉन्च होणार आहे.भारतात सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांसाठी स्वदेशी कोरोना लस येऊ शकतेभारत बायोटेक लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी कोविड १९ लस बनवत आहेत.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या(Coronavirus) तिसऱ्या लाटेपूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतातच लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. आयसीएमआर-एनआयवीच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी २ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या कोव्हॅक्सिन(Covaxin) फेज २ आणि फेज ३ ची चाचणी झाली असून भारतात सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांसाठी स्वदेशी कोरोना लस येऊ शकते असं म्हटलं आहे.

प्रिया अब्राहम यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, अपेक्षा आहे की या चाचणीचे निष्कर्ष लवकरच उपलब्ध होतील. त्यानंतर नियामक आयोगाला पुढील परवानगीसाठी पाठवण्यात येईल. सप्टेंबर किंवा त्याच्या पुढील महिन्यापर्यंत लहान मुलांना कोविड १९ लस उपलब्ध होऊ शकते. आयसीएमआर आणि हैदराबाद येथील लस उत्पादक कंपनी भारत बायोटेक लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी कोविड १९ लस बनवत आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात Covovax येणार

अलीकडेच काही दिवसांपूर्वी सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर अदार पूनावाला यांनी म्हटलं की, सीरमची Covavax ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लॉन्च होणार आहे. ही लस १२ वर्षावरील मुलांसाठी असेल. तसेच पुढील २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांसाठी लस लॉन्च होईल. भारत सरकार पूर्ण सहकार्य करत असून कुठेही आर्थिक तुटीची शक्यता नाही असं त्यांनी सांगितले होते.

तर लसीच्या वाटपावरुन सांगितले की, आम्ही १३ कोटी कोविड लसी प्रत्येक महिन्याला देत आहोत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने  २ ते १७ वर्षापर्यंत मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी काही अटींसह परवानगी देण्याची शिफारस केली आहे. माहितीनुसार चाचणीत १० ठिकाणी २९० लहान मुलांचा समावेश करण्यात येईल. ज्यात १२ ते १७ वयोगटातील आणि आणि २ ते ११ वयोगटातील प्रत्येकी ४६० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु

सध्या १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. लहान मुलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जास्त संक्रमित होण्याचा धोका आहे. त्यामुळे जगभरात लहान मुलांसाठी लसीची चाचणी घेतली जात आहे. अमेरिकेत फायजर कंपनीने १२ वर्षावरील मुलांसाठी लसीची चाचणी सुरु केली आहे. भारतात बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर चाचणी सुरु आहे. या चाचणीचे सकारात्मक निष्कर्ष समोर येत आहेत. तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लहान मुलांसाठी लस लवकरात लवकर आणण्यासाठी युद्धास्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लस आल्यानंतर त्याचे उत्पादन आणि वितरण जास्तीत जास्त कसं केले जाईल याबाबत वेगाने योजनांची तयारी केली जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या