नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत असलेल्या भारतानं देशात कोरोना लसीच्या उत्पादन क्षमतेला गती दिली आहे. त्याचसोबत भारतात नोवावॅक्स(Novavax) लस बनवण्याची तयारी करत आहे. या लसीचं उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे. जे ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड लसीचं उत्पादन करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत झालेल्या लसीकरण चाचणीच्या अंतिम टप्प्यात ही लस ९० टक्के प्रभावी ठरली आहे.
नोवावॅक्सनंतर भारत सरकारने बायोलॉजिकल ई या कोरोना लसीचे ३० कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. भारत सरकारने आतापर्यंत नागरिकांना ३ मान्यता प्राप्त कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसीचे २६ कोटी डोस दिले आहेत. कोरोना संक्रमणाचा आकडा पाहिल्यास अमेरिकेनंतर जगभरात सर्वाधिक संक्रमण असलेल्या देश भारत आहे. भारतात संक्रमणाचा आकडा आतापर्यंत २.९ कोटीपर्यंत पोहचला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत ३.३ कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. तिसऱ्या नंबरवर ब्राझील आहे. जिथे १.७५ कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
जगभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा पाहिला तर भारत अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱ्या नंबरवर आहे. आतापर्यंत भारतात कोविड १९मुळे ३ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत. भारत सरकारने यावर्षा अखेरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस देण्याचं टार्गेट ठेवले आहे. परंतु लसीचा अभाव आणि लस लावण्याबद्दल जागरुकता यामुळे लसीकरण आधीपासून धीम्या गतीने सुरु आहे. जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ ३.५ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर १५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
सध्या भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लस दिली जात आहे. ज्याचं उत्पादन देशाच्या आतमध्ये सुरू आहे. भारतात रशियात बनलेली स्पुतनिक व्ही लसीच्या वापरालाही परवानगी मिळाली आहे. मात्र याचा मर्यादित स्वरुपात वापर केला जात आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेची औषध कंपनी नोवावॅक्सने पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटसोबत कोरोना लसीच्या २ अब्ज डोस बनवण्यासाठी करार केला होता. सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत नोवावॅक्स लसीचे डोस तयार होतील, भारतात या वॅक्सिनचं नाव कोवोवॅक्स(Covovax) ठेवण्यात आले आहेत.
लसीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपेल. परंतु त्याआधी लसीच्या चाचणीचे ग्लोबल डेटा आधारावर कंपनी व्हॅक्सिनच्या वापरासाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकते. लोकांना नोवावॅक्स लसीचे दोन डोस द्यावे लागतील. अमेरिकेत झालेल्या गंभीर संक्रमणावरील रुग्णांवर या लसीचे परिणाम ९१ टक्के सकारात्मक झाल्याचं दिसून आलं आहे. तर मध्य आणि सौम्य संक्रमण असलेल्यांसाठी १०० टक्के प्रभावी ठरली आहे.
बायोलॉजिकल ई लसीची माहिती
भारत सरकारने स्वदेशी लस उत्पादन करणारी कंपनी बायोलॉजिकल ई ला ३० कोटी लसीचे डोस बनवण्याची ऑर्डर दिली आहे. ही पहिली लस आहे जिला अद्याप देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली नाही तोवर सरकारने २०.६ कोटी डॉलरचे ऑर्डर दिले आहेत. ही लस अमेरिकन कंपनी डायनावॅक्स आणि बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनच्या मदतीनं बनवली आहे. सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. आतापर्यंत याला नाव देण्यात आले नाही. या वॅक्सिनबद्दल सरकारने सांगितले की, पहिल्या दोन टप्प्यात या लसीचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत तर तिसऱ्या टप्प्यात १ हजारपेक्षा अधिक लोकांना याचे डोस दिलेत. त्यांच्या तब्येतील सध्या लक्ष ठेऊन आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, नवी लस पुढील काही महिन्यात देशात उपलब्ध होऊ शकते. यावर्षी एप्रिल महिन्यात देशात लसीची उपलब्धता आणि लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी दुसऱ्या देशात वापरण्यात येत असलेल्या कोरोना लसींचा देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे फायझर आणि मॉर्डना या दोन लसीही देशात लवकर उपलब्ध होऊ शकणार आहेत.