शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:45 AM

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती.

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यात शनिवारपासून लसीकरण मोहीम वेगाने हाती घेण्यात आली असली तरीदेखील दुसऱ्याच दिवशी या लसीकरण मोहिमेला खीळ बसली आहे. कारण लसीकरणासाठीच्या कोविन-अ‍ॅपवर नाव-नोंदणी करण्यास अडथळा येणे. नाव-नोंदणी करतेवेळी किंवा नोंदणी झाल्यानंतर संदेश न जाणे अशा तांत्रिक समस्या येत आहेत. त्यामुळे रविवारसह सोमवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगिती केल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले.मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि, यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र आता कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले असून, ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने १७ सह १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता आहे. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणूक क्षमता असून, लस देण्यास ५०० पथक व दिवसाला ५० हजार जणांना लस देण्याचे नियोजन आहे. महापालिकेने नऊ केंद्रांवर मिळून ४० लसीकरण बूथ कार्यान्वित केले आहेत. शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित केले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे सुमारे १,३९,५०० डोस पालिकेला उपलब्ध झाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरmedicineऔषधं