नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
एका तरुणीने कोरोना लसीचा धसका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना लस पाहताच तरुणी घाबरली आणि मोठमोठ्य़ाने ओरडायलाच लागली. लसीकरण केंद्रावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रावर तरुणीने घातलेल्या गोंधळाचा Video सोशल मी़डियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील लेबडमध्ये कोरोना लसीकरणादरम्यान एक जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. केंद्रावर एक तरुणी लस घेण्यासाठी पोहोचली. पण इंजेक्शन पाहून ती इतकी घाबरली की जोरजोरात ओरडून रडू लागली.
नातेवाईकांनी तिला पकडून लसीकरण केंद्रावर पुन्हा नेलं आणि लस घेतली
रीना असं या तरुणीचं नाव असून ती कोरोना लस घेण्यासाठी तयारच नव्हती. त्यामुळेच तिच्या कुटुंबीयांनी तिला खूप समजावलं आणि लस घेणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं. पण तरी देखील तरुणी लस घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी तिला पकडून लसीकरण केंद्रावर पुन्हा नेलं आणि कोरोना लस घेतली. याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. याआधी देखील काही लोकांनी लस घेण्यास नकार देत असा गोंधळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाची तिसरी लाट ठरेल जीवघेणी
डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते असं म्हटलं आहे. संशोधकांनी सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते. तज्ञांनी अलर्ट दिला असून सुट्टीचा कालावधीत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकते आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात. संशोधकांनी 'ओपीनियन पीस' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडू शकते असं म्हटलं आहे.