शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर पडणार भारी; Covishield, Covaxin लसीच्या मिश्रणाची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 9:01 AM

अमेरिका, यूकेसह काही देशांमध्ये याआधीच विविध लसींच्या मिश्रणाची चाचणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसध्या तामिळनाडू येथील क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला लसीच्या मिश्रणाची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली३०० आरोग्य स्वयंसेवकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे एक एक डोस दिले जातीलअनेक पाश्चिमात्य देशात फायजर, मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका लसीचे मिश्रण केले जात आहे

 नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या दोन लसींचे कॉकटेल करण्याची चाचणी सुरु झाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) नं यासाठी मंजुरी दिली आहे. चाचणीत कोविशील्ड(covishield) आणि कोव्हॅक्सिन(covaxin) लसीचे एक एक डोस दिले जातील. त्याचा लोकांवर काय परिणाम होतो याचा आढावा घेतला जाईल. भारतात ही पहिली स्टडी आहे. 

अमेरिका, यूकेसह काही देशांमध्ये याआधीच विविध लसींच्या मिश्रणाची चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी नेमकी कशी असेल आणि त्याचे फायदे काय होतील याबाबत जाणून घेऊया. सध्या तामिळनाडू येथील क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला लसीच्या मिश्रणाची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ३०० आरोग्य स्वयंसेवकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे एक एक डोस दिले जातील. या ग्रुपला दोन गटात विभागलं आहे. पहिल्या ग्रुपला कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येईल तर दुसऱ्या ग्रुपला कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येईल. दुसरे डोस वेगळे देण्यात येतील. 

लसीचं मिश्रण कधी करतात? या चाचणीत काय होणार?कोविड १९(Covid 19) च्या पहिल्या अनेक स्टडीत समोर आलंय की, लसीचं मिश्रण केल्यास इम्युनिटी वाढतेय. सामान्यत: लसीच्या मिश्रणाने विविध व्हेरिएंटविरोधात लढण्याची क्षमता वाढते. कोव्हॅक्सिन एक इनएक्टिवेटेड होल व्हायरस व्हॅक्सिन आहे तर कोविशील्ड एडेनोवायरस प्लॅटफोर्म आधारित व्हॅक्सिन आहे. 

तज्ज्ञांच्या मते, कोविशील्ड केवळ एँटी स्पाइक प्रोटीन रेस्पॉन्स ट्रिगर आहे. बूस्टर म्हणून कोव्हॅक्सिन यूज केल्यानं तो रेस्पॉन्स आणखी मजबूत होतो आणि सर्व SARS-Cov-2 प्रोटीन्सविरोधात चांगली रोगप्रतिकार शक्ती तयार होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दोन डोससाठी एकाच लसीचा उपयोग केला पाहिजे. चुकून दुसरा डोस दिला गेला तर कुठल्याही व्हॅक्सिनचा अतिरिक्त डोस घेण्याची गरज नाही. 

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR)ने एका स्टडीनंतर म्हटलंय की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिश्रणामुळे कोविडविरोधात चांगली इम्युनिटी तयार होते. डि. व्हिके पॉल म्हणतात की, वैज्ञानिकांच्या दृष्टीकोनातून असं केले जाऊ शकते. परंतु त्यासाठी रिसर्च गरजेचा आहे. डोसचं मिश्रण केले पाहिजे असं ठोसपणे सांगता येऊ शकत नाही. 

लसीच्या मिश्रणाचे फायदे काय?काही रिसर्चमध्ये दावा केलाय की, मिश्रण केल्याने कोरोना व्हायरसविरोधात जास्त सुरक्षा मिळते. मिश्रण केलेले डोस व्हायरसच्या विविध भागांवर हल्ला करतात. इम्युनिटी सिस्टम तयार होते. त्यामुळे नव्या व्हेरिएंटविरोधातही सुरक्षा मिळू शकते. लसीचे मिश्रण करण्याचा सर्वात मोठा फायदा की, लसीच्या तुटवड्याचा प्रश्न सुटेल. सध्या देशात लसींचा अभाव आहे. त्यामुळे दोन लसींचे डोस मिश्रण केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. भारतात दोन लसींच्या मिश्रण वापरण्यास परवानगी मिळाली तर देशात लसीकरण मोहिमेला वेग येईल. 

जगात लसीच्या संमिश्र डोसचे नियम काय?अनेक पाश्चिमात्य देशात फायजर, मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका लसीचे मिश्रण केले जात आहे. कॅनडात लसीचा पहिला डोस फायजरचा आणि नंतर मॉडर्ना लसीचा डोस देण्यात येतो. अमेरिकेत आपत्कालीन परिस्थितीत फायजर बायोएनटेक लस आणि मॉडर्ना लस २८ दिवसांच्या काळात मिश्रण करण्याची परवानगी आहे.  यूकेमध्ये सध्या मिश्रण असलेल्या लसीचे डोस दिले गेले आहेत. त्यावर चाचणी सुरू आहे. त्याशिवाय चीन, रशिया, नॉर्वे, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडनसारख्या अनेक देशात लसीच्या मिश्रणाला मंजुरी मिळून त्यावर चाचणी सुरू आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या