शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 4:35 PM

Corona Vaccination: मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भोपाळ जिल्ह्यामधील डीईओंनी लस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याबाबत सूचना दिली आहे. (One month salary of teachers not vaccinated against corona vaccine)

कोरोनाविरोधातील लस न घेण्यासाठी योग्य कारण न देणाऱ्या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन सक्सेना यांनी याबाबत सांगितले की, शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. भोपाळ जिल्ह्यात एकूण १७ सेंटर उघडण्यात आली आहेत.

आतापर्यंत ९२ शिक्षक असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतलेला नाही. सहा दिवसांच्या आत लस न घेण्यामागचे योग्य कारण न दिल्यास या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे  लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे.

शिक्षक काँग्रेसचे प्रांतीय अध्यक्ष सुभाष सक्सेना यांनी सांगितले की भोपाळ जिल्ह्यामध्ये सुमारे एक हजार शिक्षक असे आहेत. ज्यांचे आतापर्यंत लसीकरण झालेले नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये भोपाळ जिल्हा सर्वात लहान आहे. राज्यात सुमारे ३० ते ४० हजार शिक्षकांना अद्यापही लसीचा पहिला डोस मिळालेला नाही. आता कॅम्पच्या माध्यमातून शिक्षकांचे लसीकरण करण्याची तयारी केली जाणार आहे.

दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन सक्सेना यांनी सांगितले की, भोपाळमध्ये ११०० नाही तर ९२ शिक्षक असे आहेत ज्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आलेला नाही. लस न घेतलेल्या शिक्षकांची यादी माझ्याजवळ आहे. सर्वांना लस देण्यासाठी ५ ते सहा दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  मध्य प्रदेशचे मुख्य सचिव इक्बाल सिंग बैंस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी बैंस यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. २६ ते ३१ जुलैपर्यंत ६ दिवसांमध्ये शाला आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करून सर्व शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश