शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Corona vaccine : "देशातील लोकांना लस मिळत नाही आणि तुम्ही अन्य देशांना व्हॅक्सिन कसली विकताय" हायकोर्टाची फटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:07 PM

Corona vaccine News : - गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असला तरी त्याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असला तरी त्याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. केंद्र सरकारने (Central Government) कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. (Corona Vaccination) त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने देशातील नागरिकांना लस मिळत नसताना तुम्ही ती अन्य देशांना का विकताय. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करत का करत नाही असा सवाल सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला विचारला आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी वर्गिकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे. ("People in the country do not get vaccines and how do you sell vaccines to other countries?")याबाबत सुनावणी करणात दिल्ली हायकोर्टाने आज सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला कोरोनावरील लस बनवण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. भारतात ज्या दोन कोरोना लसींच्या वापराला मान्यता मिळाली आहे त्यातील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया करत आहे. तर भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे उत्पादन करत आहे.  कोर्टाने केंद्र सरकारकडेही कोविड-१९ विरोधातील लसीकरणामध्ये लाभार्थ्यांच्या विविध गटात केलेल्या वर्गिकरणामागच्या कारणाचीही विचारणा केली आहे. केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात केली होती. यात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहे. 

 न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने सांगितले की, दोन्ही कंपन्या सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेककडे अधिक क्षमतेने लस उपलब्ध करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांच्याकडून या क्षमतेचा पुरेसा वापर करण्यात येत नाही आहे. आम्ही सध्या लस अन्य देशांना दान करत आहोत किंवा विकतोय. मात्र आपल्या लोकांना लस देत नाही आहोत. या प्रकरणात जबाबदारी आणि तत्कालिकता असली पाहिजे, असेही कोर्टाने सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHigh Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य