नवी दिल्ली: गेल्या सलग काही दिवसांपासून देशभरात प्रतिदिन तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. (corona vaccine rahul gandhi demands for free vaccination all people in country)
राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून, ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे.
कोरोना लस मोफत द्या आणि विषय संपवा
चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. विषय संपला. भारताला भाजपच्या यंत्रणेची शिकार होऊ देऊ नका, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र
हाच काँग्रेसचा धर्म
तर, यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असेही एक ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा
दरम्यान, भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.