नवी दिल्ली: पहिल्यांदाच देशात ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण करण्यात आलं आहे. भारतातील मणिपूर राज्यातून याची सुरुवात झाली. दक्षिण पूर्व आशियामध्ये आज प्रथमच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला. मणिपूरमधील विष्णुपूर ते करंगपर्यंत रस्त्याने 26 किमी अंतर हवाई मार्गाने 15 किमी झाले आणि फक्त 12-15 मिनिटांत ICMR ने लस दिली. ICMR ने मणिपूरच्या लोक टाक सरोवरातून, करंग बेटावर ड्रोनद्वारे लस यशस्वीरित्या वितरित केली. हे पूर्णपणे मेड इन इंडिया ड्रोन आहे.
या प्रसंगी आनंद व्यक्त करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, आज प्रथमच दक्षिण पूर्व आशियात ड्रोनचे व्यावसायिक उड्डाण झाले आहे. यासाठी ICMR, मणिपूर सरकार, तांत्रिक कर्मचारी यांचे अभिनंदन. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मणिपूरच्या करंग क्षेत्राची लोकसंख्या सुमारे 3500 आहे, ज्यात 30% लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आगामी काळात मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांमध्ये अशा ड्रोनच्या मदतीने लस देण्याची योजना आहे.
मांडविया पुढे म्हणाले की, ड्रोनद्वारे आज लस पुरवली जात आहे. भविष्यात आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत, जीवनरक्षक औषधे याद्वारे दिली जाऊ शकतात. कीटकनाशक आणि युरियाची फवारणीदेखील यातून केली होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व अडचणी आणि चढउतारांचा सामना करुन भारत लवकरच 100 कोटी डोसचा आकडा पार करणार आहे.