नवी दिल्ली : देशभरात आता केवळ २ कोटी ४ लाख ९६ हजार ५२५ डोस राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत, तर येत्या तीन दिवसांत २ लाख ९४ हजार ६६० डोस राज्यांना दिले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसींचे २० कोटी ७६ लाख १० हजार २३० डोस नि:शुल्क पुरविण्यात आले आहेत. यापैकी १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ डोसचा वापर केला. उत्तर प्रदेशात २२ लाख ७० हजार २१६ डोस शिल्लक आहेत. यापाठोपाठ तमिळनाडूत १४ लाख १९ हजार २९६, मध्य प्रदेश १३ लाख ७३ हजार ७८३, गुजरात ११ लाख २५ हजार ५४७, आंध्र प्रदेश ११ लाख २१ हजार ३६९, छत्तीसगढ ९ लाख ९६ हजार ९८६, प. बंगाल ९ लाख १७ हजार ०४४, झारखंड ८ लाख ८९ हजार २१२, ओडिशा ७ लाख ९२ हजार ५६१, तसेच कर्नाटकमध्ये ७ लाख ६ हजार ७३१ डोस शिल्लक आहेत.
डोसचे वाटप आणि वापरराज्य डोसचे वाटप डोसचा वापरमहाराष्ट्र २,०१,५४,९३० १,९७,३३,३१४उ. प्रदेश १,७४,५०,०१० १,५१,७९,७९४गुजरात १,६२,०४,७३० १,५०,७९,१८३राजस्थान १,६०,८९,८२० १,५९,५०,३७२प. बंगाल १,३४,८३,६४० १,२५,६६,५९६कर्नाटक १,१८,९७,४४० १,११,९१,७०९म. प्रदेश १,०७,५१,०१० ९३,७७,२२७बिहार ९८,०३,२७० ९३,४८,७७२केरळ ८८,६९,४४० ८४,१५,४५७ तमिळनाडू ८६,५५,०१० ७२,३५,७१४
कोरोना विषाणूचा हवेतून होतो संसर्गविषाणूचा हवेतून संसर्ग होतो, असे कित्येक संशोधकांनी व्यक्त केलेल्या मतला आता जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनेही मान्यता दिली आहे. १४ देशांतील ३९ शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाआधारे जर्नल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, इमारतीतील वायुवीजनाची व्यवस्था तसेच पाण्याच्या फिल्टरेशनची यंत्रणा अधिक उत्तम असल्यास विषाणू संसर्गाचे धोके कमी होतात.