शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Corona Vaccine: ‘आधार’अभावी लस, इतर सेवा नाकारता येणार नाही; इतर पर्यायांचा वापर शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 8:24 AM

‘यूआयडीएआय’ने केले स्पष्ट; आधारकार्ड नसल्यास किंवा काही कारणास्ताव त्याची ऑनलाइन पडताळणी होत नसली तरीही सेवा नाकारता येणार नाही. याबाबत आधार कायद्यात मार्गदर्शक सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून लस, औषधे, रुग्णालयात दाखल करून घेणे तसेच उपचारांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय)ने स्पष्ट केले आहे. 

“यूआयडीएआय”तर्फे सांगण्यात आले की, कोणतीही सेवा नाकारण्यासाठी ‘आधार’ नसल्याचे कारण देता येणार नाही. कोणाकडे आधारकार्ड नसल्यास कोणत्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो, हे सातत्याने सपष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणालाही लस, औषधे, उपचार तसेच रुग्णालयात दाखल होण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. आधार कार्ड नसल्याने अनेक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासारख्या सेवांपासून वंचित ठेवले जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्राधिकरणाने आधारकार्ड कायद्यातील तरतुदींचा दाखला दिला आहे. आधारकार्ड नसल्यास किंवा काही कारणास्ताव त्याची ऑनलाइन पडताळणी होत नसली तरीही सेवा नाकारता येणार नाही. याबाबत आधार कायद्यात मार्गदर्शक सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 

‘आधार’ला काही अपवाद सार्वजनिक सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘आधार’ उपयुक्त आहे. मात्र, त्यास काही अपवाद असून ‘आधार’ नसल्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याला सेवा किंवा लाभ नाकारता येणार नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी.

लस निर्यातीचे केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात समर्थनकोरोना महामारीचा सामना करताना संपूर्ण जग एक असल्याचे सांगून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लस निर्यातीचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले आहे. उत्पादनाचा विचार करुनच प्राथमिकता ठरवून लसीकरणाचा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात मार्च महिन्यात शपथपत्र दाखल केले होते. त्यात केंद्राने म्हटले आहे, की एखादी साथ जेव्हा जागतिक महामारीचे स्वरुप घेते तेव्हा त्याचा सामना संपूर्ण जग एक असल्याप्रमाणे करावा लागतो. जागतिक लसीकरणाला प्रतिसाद म्हणून सरकारने लसींची निर्यात केली. इतर देशातील संसर्गाचा धोका असलेल्या नागरिकांना संरक्षण देणे आवश्यक होते. 

...गोंधळ उडाला असता

याशिवाय सरकारने आणखी एक तर्क दिला आहे. सरकारने म्हटले आहे, की निर्यात मर्यादित होती. तसेच देशांतर्गत गरजेचा विचार करण्यात आला होता.  देशातील लस उत्पादन आणि उपलब्ध आरोग्य सुविधांमध्ये असामनता होऊ नये यासाठी प्राथमिकता ठरवून लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अन्यथा गोंधळ उडाला असता.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCorona vaccineकोरोनाची लस