नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसींमुळे ४२ लाख लोकांचे प्राण वाचले, असा दावा लॅन्सेट इनफेक्शियस डिजीज जर्नलने केला आहे. या नियतकालिकाने केलेल्या विविध देशांच्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत देशभरामध्ये १७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. ८ डिसेंबर २०२० ते ८ डिसेंबर २०२१ या कालावधीत जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करून लॅन्सेटने हा निष्कर्ष काढला आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत जगभरात कोरोनाने ४७ लाख लोक मरण पावले असावेत, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
लसींमुळे जगभरात
३.१४ कोटींहून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत, असे लॅन्सेटच्या पाहणीत म्हटले आहे. त्यासाठी १८५ देशातील कोरोना स्थितीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. लॅन्सेटने केलेल्या या पाहणीचे प्रमुख व लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे प्राध्यापक ऑलिव्हर वॉटसन यांनी सांगितले की, भारताने कोरोना प्रतिबंधक लसी तयार केल्या.तसेच लसीकरण मोहीम वेगाने राबविली. त्यामुळेच अनेक लोकांचे प्राण वाचू शकले. ही गौरवास्पद कामगिरी आहे.