नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना परिस्थिती गंभीर आहे. या कोरोना परिस्थितीवरून दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी (Adesh Gupta) पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा हवाला देत-देत केजरीवाल सरकारने दिल्लीला कोरोनाचा मृत्यूदर प्रती 10 लाखांच्या यादीत आघाडीवर आणून ठेवला आहे. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला आहे. केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. (funeral procession of 16593 bodies with corona protocol between 1 april and 17 may in delhi said adesh gupta)
याचबरोबर, ठरवा आणि निवडा या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. मात्र दुसरीकडे शेकडो असे कोरोना योद्धे आहेत जे मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. एवढंच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजनक असताना अरविंद केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे दिल्लीत रुग्णांचा मृत्यू होत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती १० लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असे आदेश गुप्ता म्हणाले.
दिल्लीत केजरीवाल सरकारने पहिल्या लाटेच्यावेळी सुद्धा आकडे लपवल्याचा खेळ खेळला होता, असा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला. तसेच, दुसऱ्या लाटेच्या वेळीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानवतेलाही लाजवेल अशी वागणूक दिल्लीकरांना देत मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात दिल्लीत 450 हून अधिक जणांचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसात वेगवेगळ्या स्मशानभूमींवर एका दिवसात 700 हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे आदेश गुप्ता यांनी सांगितले.
आकडेवारी दर्शविते की 1 एप्रिल ते 17 मे दरम्यान दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील स्मशानभूमींमध्ये 16593 मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोरोना विधीने करण्यात आले. केजरीवाल सरकारने या काळात केवळ 11061 मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. केजरीवाल सरकारला मृतांची संख्या बदलून मृतांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देणे टाळायचे आहे का? केजरीवाल सरकारने मृतांची संख्या लपवून खोटे आरोप करण्याच्या लालसेने संवेदनशीलतेच्या कळसांवर विजय मिळविला ही बाब लाजिरवाणी आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागावी, असेही आदेश गुप्ता म्हणाले.