बुंदेलखंड: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तरीही धोका कायम आहे. देशाच्या अनेक राज्यांमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे. अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला मृत्यूनंतरही यातना सुरुच आहेत.कोरोना संकटात मोदी सरकारला आठवले पंडित नेहरू; ५७ वर्ष जुना आदेश पुन्हा लागूउत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू आहे. लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शेजारी, आप्तस्वकिय, नातेवाईक मदतीसाठी पुढे जात नाहीत. अनेकांना तर पार्थिवाला खांदा देण्यासाठी ४ माणसं मिळवणंदेखील अवघड झालं आहे. त्यामुळेच शोकमग्न कुटुंबीय त्यांच्या जवळच्या व्यक्तीला हातगाडी, रिक्षाच्या मदतीनं स्मशानभूमीत घेऊन येत आहेत....ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशाराहमीरपूर जिल्ह्याच्या मुक्तिधाममध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याआधी त्याला ताप आला होता. संशयास्पद स्थितीत त्यानं प्राण सोडला. त्यांच्या निधनाची माहिती नातेवाईकांना, शेजाऱ्यांना कळवण्यात आली. मात्र कोणही त्यांच्या मदतीला पुढे आलं नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मुलांनी एक हातगाडी मागवली आणि वडिलांचा मृतदेह त्यावर ठेवून स्मशानभूमी गाठली.हमीरपूर जिल्हा मुख्यालयाच्या दोन्ही बाजूला केवळ एक किलोमीटर अंतरावरून यमुना आणि बेतवा नद्या वाहतात. या दोन नद्यांच्या मधोमध शहर वसलं आहे. दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर शेकडो गावं आहेत. सध्या कोणाचाही मृत्यू झाल्यावर त्यांचे मृतदेह नदीत सोडले जातात. कोरोना संकटात अनेकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. यामुळे नदीत मृतदेहांचा पूर आल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
इथे ओशाळली माणुसकी! खांदा द्यायला ४ माणसंही मिळेनात; मृत वडिलांना हातगाडीवरून नेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:51 PM