पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:41 IST2025-04-22T13:39:25+5:302025-04-22T13:41:11+5:30

Corona Virus: आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याची माहिता समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Corona Virus: Corona has returned again, a woman's death in Madhya Pradesh, 2 patients have been found | पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण

पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण

पाच वर्षांपूर्वी झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाने जगभरात खळबळ उडवली होती. त्यानंतरच्या दीड दोन वर्षांमध्ये भारतात लाखो लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. मात्र पुढे हळूहळू प्रतिबंधात्मक उपाययोजनांनंतर ही साथ जवळपास संपुष्टात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याची माहिता समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोटदुखीमुळे त्रस्त झालेली एक महिला इंदूर येथील रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर किडनीशी संबंधित आजाराबाबत उपचार सुरू होते. दरम्यान, तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीमधून समोर आले. तसेच उपचारांदरम्यान, तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळळ उडाली. तसेच आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना विषाणू पुन्हा परतल्याने डॉक्टरही अवाक् झाले आहेत.

मध्य प्रदेशणधील इंदूरमध्ये बऱ्याच काळानंतर कोरोनाचा संसर्ग झालेले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यातील एक तरुण आहे. तर दुसरी एक वयस्कर महिला होती. दोघांनाही वेगवेगळ्या आजारांमुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर युवकावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या तरुणाला दोन तीन दिवसांपासून सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होता. त्याच्या विविध चाचण्या केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले.

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेली महिला ही इंदूर पश्चिम परिसरातील रहिवासी होती. या ७४ वर्षीय महिलेला किडनीशी संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची गंभीर स्थिती विचारात घेऊन तिची फ्लू पॅनल तपासणी करण्यात आली. त्यात तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. या महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. तिला किडनीच्या आजाराबरोबरच इतरही आजार होते, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यातच तिला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.  

Web Title: Corona Virus: Corona has returned again, a woman's death in Madhya Pradesh, 2 patients have been found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.