नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा(Coronavirus ) फैलाव सुरू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3,17,532 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, संसर्ग दर(पॉझिटिव्हिटी रेट) 16 टक्क्यांच्या वर गेला आहे. यासोबतच ओमायक्रॉन या विषाणूच्या रुग्णांची संख्याही 9 हजारांच्या पुढे गेली आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांमध्येवाढकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या 24 तासांत 491 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे आतापर्यंत एकूण 4,87,693 लोकांनी आपला जीव गमावला आहे. दुसरीकडे, भारतात ओमायक्रॉनची एकूण प्रकरणे 9,287 वर पोहोचली आहेत. त्यात कालच्या तुलनेत 3.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात 19,24,051 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. एकूण प्रकरणांपैकी 5.03 टक्के सक्रिय प्रकरणे वाढली आहेत.
आतापर्यंत 159 कोटींपेक्षा जास्त लसीकरणदिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोबीस तासांत 2,23,990 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत तर आतापर्यंत 3,58,07,029 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. दैनंदिन संसर्ग दरही 16.41 टक्के वाढला तर साप्ताहिक संसर्ग दर 16.06 टक्के झाला आहे. याशिवाय, देशभरात आतापर्यंत 159.67 कोटी डोस देण्यात आले आहेत. काल 73 लाख 38 हजार 592 डोस देण्यात आले.