Corona Virus ( Marathi News ) : नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा सुरू झाला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे दोन वर्षांपूर्वीच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओनेही (WHO) कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.
WHO च्या म्हणण्यानुसार, गेल्या चार आठवड्यात जगभरात कोरोना प्रकरणांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत मृत्यूंच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली असून 3 हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. WHO नेही सातत्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. WHO सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यासोबतच डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, वाढत्या केसेस पाहता खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सिंगापूरमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे. याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्यामुळेच सिंगापूरमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.
भारतात गेल्या 24 तासांत 752 नवीन रुग्ण भारतात सुद्धा कोरोनाची प्रकरणे वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 3420 झाली आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.