नवी दिल्ली - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (18 जानेवारी) सकाळी पुण्यात कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 42 झाला आहे. देशातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र सरकारी यंत्रणांनी वेळेत पावले उचलल्यामुळेच अन्य देशांप्रमाणे भारतात रुग्ण वाढले नाहीत.
चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोनाचे एकूण चार टप्पे आहेत. हे टप्पे कोणते आणि भारताता कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेऊया.
पहिला टप्पा
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा व्हायरस वेगाने जगभरात पसरत आहे. कोराना व्हायरस संक्रमित असलेल्या देशामध्ये वास्तव्य असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही अधिक असते. तसेच त्याचा संसर्ग झाल्यास इतरांना देखील तो होण्याचा धोका हा अधिक आहे. भारतात कोरोना व्हायरस हा बाहेरून आला आहे. पहिल्या टप्प्यात हा व्हायरस एखाद्या ठिकाणी शिरकाव करतो.
दुसरा टप्पा
सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात कोरोना हा देशात असलेल्या व्यक्तींमुळे पसरतो. म्हणजेच स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. भारतात सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र संसर्ग झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत राहीला तर तो तिसऱ्या टप्प्यात जाईल आणि त्यासोबतच नियंत्रण मिळवण कठीण होईल. तिसऱ्या टप्प्यात सरकारला मॉल, दुकाने, शाळा आणि गर्दीची ठिकाणे सक्तीने बंद करावी लागतात.
चौथा टप्पा
सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो. तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे.
कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय भारतीय लष्करातील एक जवानही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोलकात्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला असून, तो रुग्ण लंडनवरून परतला आहे. रुग्णाला बालीघाटमधल्या आयडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचं हे पहिलंच प्रकरण आहे. ब्रिटनवरून परतलेला हा रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या रुग्णाचे आई-वडील आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 18 वर्षांचा हा तरुण 15 मार्च रोजी ब्रिटनवरून परतला होता. आता त्या तरुणासह आई-वडील आणि चालकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण
Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क
Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर
MP Crisis: ‘माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत तरीही पोलिसांनी रोखलं’