अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती नदीत तसेच कांकरिया, चंडोला या तलावांतील पाण्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. गांधीनगर येथील आयआयटी व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला.
गांधीनगर आयआयटीमधील पृथ्वीविज्ञान या विषयाचे प्राध्यापक मनीषकुमार यांनी सांगितले की, साबरमती नदी व अहमदाबादमधील दोन तलावांच्या पाण्यामध्ये कोरोना विषाणू आढळणे हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे बिकट समस्या निर्माण होऊ शकते. ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत दर आठवड्याला साबरमती नदी व दोन तलावांतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. साबरमती नदीतून ६९४, चंडोला तलावातून ५४९, तर कांकरिया तलावातून ४०२ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. त्यात कोरोना विषाणूंचे अस्तित्व आढळले.
हे विषाणू नदी, तलावांसारख्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये बराच काळ जगू शकतात, असेही प्रा. मनीषकुमार यांनी सांगितले.
सांडपाण्यातहीघेतला शोधn सांडपाण्यामध्येही कोरोना विषाणू असण्याची शक्यता कर्नाटक सरकारने लक्षात घेतली. त्यानुसार सांडपाण्याची तपासणी करून मगच त्याचा निचरा करण्याचा देशातील पहिला प्रयोग बंगळुरू येथे राबविण्यात आला.n उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्यात कोरोना रुग्णांचे मृतदेह सोडून देण्यात आले होते. १०० हून अधिक मृतदेह नदीत सोडून देण्यात आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला होता. या प्रकाराने खूपच खळबळ माजली होती.