सध्या भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दररोज पाच हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. सरकार लोकांना सतत कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. आज देशभरातील कोविड रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. त्याच वेळी, भारतीय वैद्यकीय संस्थेने (IMA) देशात कोरोना पसरण्याची कारणं सांगितली आहेत.
IMA ने सांगितलं आहे की अनेक कारणांमुळे देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आयएमएने म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात निष्काळजीपणा, देशात चाचणीची कमी संख्या आणि नवीन व्हेरिएंटमुळे कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. लोक सतत कोरोना व्हायरच्या विळख्यात येत आहेत. राज्य सरकारांबरोबरच केंद्र सरकारही सातत्याने बैठका घेत आहे. जर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर परिस्थिती बिघडू शकते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
भारतात एका दिवसात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 5,880 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,62,496 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 35,199 वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी चार आणि गुजरात, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 35,199 लोकांवर कोरोना व्हायरस संसर्गासाठी उपचार केले जात आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.8 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.73 टक्के आहे. देशातील संसर्गाचा दैनंदिन दर 6.91 टक्के आहे आणि साप्ताहिक दर 3.67 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 4,41,96,318 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"