देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 20 हजार 528 नवे रुग्ण (Corona Cases in India) समोर आले आहेत. जे लकालच्या तुलनेत 2.4% अधिक आहेत. याच बरोबर 49 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी शनिवारी 20,044, तर शुक्रवारी 20,038 नवे कोरोना बाधित समोर आले होते.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये समोर आले आहेत. येथे 2 हजार 871 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर पश्चिम बंगालमध्ये 2 हजार 839 रुग्ण समोर आले, महाराष्ट्रात 2 हजार 382 रुग्ण, तामिळनाडूमध्ये 2 हजार 340 रुग्ण तर कर्नाटकात 1 हजार 374 रुग्ण समोर आले आहेत.
देशातील कोरोना मृतांचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर -देशात गेल्या 24 तासांत 49 कोरोना बाधितांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे आता देशातील कोरोना मृतांचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट आता 98.47 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासांत एकूण 17 हजार 790 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे एकूण 1 लाख 43 हजार 449 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांमध्ये 2,689 ने वाढ झाली आहे.