देशात कोरोना (Corona Virus) व्हायरसची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारपेक्षा आज अचानक ५००० ने नवीन कोरोनाबाधितांचा (Corona Patient) आकडा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा हा देशाच्या आकड्याच्या निम्म्याहून जास्त आहे. (India reports 22,854 new COVID-19 cases, 18,100 recoveries, and 126 deaths in the last 24 hours)
राज्यात बुधवारी एका दिवसात सापडलेल्या नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 13,659 होता. जो गेल्या वर्षीच्या 7 ऑक्टोबरमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. तर देशात आज सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्या 22,823 झाली. बुधवारी हा आकडा 17,921 एवढा होता. एका दिवसात जवळपास 5 हजारांनी वाढ झाल्याने संकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.
आजची स्थिती काय?आज देशात 22,854 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 18,100 बरे झाले आहेत. 126 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,12,85,561 झाला असून बरे झालेल्यांचा आकडा हा 1,09,38,146 आहे. तर सध्या देशभरात 1,89,226 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच एकूण मृत्यूंचा आकडा 1,58,189 वर पोहोचला आहे.