हैदराबादः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना व्हायरस(Coronavirus)ला घाबरून जाण्याची गरज नसल्याचा नागरिकांना सल्ला दिला आहे. तसेच या रोगाचा पॅरासिटामोलनं उपचार होत असल्याचा त्यांनी दावाही केला आहे. रेड्डी म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे पॅनिक बटण दाबण्याची गरज नाही. कोरोना पॅरासिटामोलच्या उपचारानं बरा होत आहे. जगनमोहन रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत हे विधान केलं आहे. याला जागतिक आपत्तीपेक्षा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अधिक पाहिलं जातंय.जर 31 मार्चपर्यंत निवडणुका झाल्यास 14व्या नियोजन आयोगानुसार राज्याला मोठी रक्कम मिळणार आहे. निवडणुका थांबवल्यास कोरोना व्हायरस थांबणार आहे काय?, 80 टक्के अशक्त लोकांनाचा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. येत्या काही दिवसांत हा व्हायरस आणखी पसरणार आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसला जीवनाचा भाग समजूनच पुढे जा. त्यानंतर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डींवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांकडून कोरोना व्हायरस हा जीवनाचा भाग असल्याचा दावा केला जात आहे. पण तो व्हायरस वेगानं पसरतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीने एवढी मोठी गोष्ट हलक्या स्वरूपात घेतलेली पाहून मला धक्काच बसला आहे. जर हा रोग पॅरासिटामोलने बरा झाला असता तर जगभरातल्या इतर देशांनी अजूनही त्यावर उपाय शोधण्यासाठी डोक्याला ताण दिला नसता. मुख्यमंत्री जे काही बडबडत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करावं. हा भयानक रोग टाळण्यासाठी प्रत्येकानं सावधगिरी बाळगावी, असं मी जनतेला आवाहन करतो, असंही नायडू म्हणाले आहेत.
Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'
कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा
Coronavirus : 'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांनी केली अटक; 11 रुपयांत विकत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज
जगभरात कोरोना व्हायरसचे दीड लाखांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. तसेच या भयंकर रोगानं आतापर्यंत 5800हून अधिक जण जिवानिशी गेले आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या 107वर गेली आहे. भारतात कोरोनानं दोघांचा मृत्यूही झाला आहे.