CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:24 PM2021-08-25T23:24:56+5:302021-08-25T23:30:47+5:30

यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते.

Corona Virus kerala daily coronavirus cases updates 31445 new covid 19 patients | CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

googlenewsNext

देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केरळने पुन्हा एकदा टेन्शन वाढवले आहे. येथे नव्या केरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. केरळमधील दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या बुधवारी तीन महिन्यांतील उच्चांकी स्थरावर पोहोचली आहे. येथे गेल्या 24 तासांत तब्बल 31,445 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर, केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3,883,429 वर पोहोचली आहे. तर 215 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 19,972 वर पोहोचला आहे.

भारतात ‘कोविशील्ड’ लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती; अँन्टिबॉडीमध्ये घट होतेय?

यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. देशाचा विचार करता, यापूर्वी, मंगळवारी देशात 37,593 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हा 13 ऑगस्टनंतरचा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. यादरम्यान, 34,169 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून 97.67 टक्क्यांवर पोहोचला आहे.

केरळमध्ये 21 ऑगस्टला ओणम सण साजरा करण्यात आला होता. या सणानंतर, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांपेक्षा अधिक जाऊ शकतो आणि संक्रमणाची संख्या आणखी वाढू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. 

अलर्ट! तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख, तर मुंबईत दिवसाला १.३ लाख रुग्ण आढळतील; आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 5,031 नवे कोरोनाबाधित -
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 031 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 47 हजार 414 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण 50 हजार 183 इतकी आहे. 
 

Web Title: Corona Virus kerala daily coronavirus cases updates 31445 new covid 19 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.