कोच्चीः जगभरासह भारतातही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 वर गेली असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळून आला होता. त्यामुळे केरळ विमानतळावरही रुग्णांची बारकाईनं तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे रविवारी एका विमानात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. कोची येथून दुबईला जाणाऱ्या एका विमानात 289 प्रवासी प्रवास करत होते. त्याचदरम्यान विमानात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं समोर आलं. त्यानंतर लागलीच विमान रिकामी करण्यात आलं. तसेच सर्व विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'
कोरोनाची लागण झालेला संबंधित नागरिक ब्रिटनचा रहिवासी आहे. कोच्ची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, विमानात चढलेला प्रवासी गेल्या काही दिवसांपूर्वी 19 लोकांच्या समूहातील एक होता, तो मुन्नारमध्ये एन्जॉय करण्यासाठी आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर मुन्नारमध्ये उपचार सुरू होते. पण तिथल्या सुविधांना कंटाळून रुग्णाने तेथून पळ काढला होता. दुबईमार्गे तो ब्रिटनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच या विमानात आला. केरळमधील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं त्या रुग्णाचा माग काढला असून, त्याला पकडून पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. पण त्याच्या या कृत्यामुळं आता 289 जणांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा
Coronavirus : 'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांनी केली अटक; 11 रुपयांत विकत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज
Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं!