शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
2
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
4
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
5
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
6
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
8
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
9
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
10
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
11
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
12
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
13
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
14
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
15
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
16
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
17
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
18
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
20
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 6:27 PM

गेल्या महिन्याच्या संख्येचा विचार करता ही संख्या पाच पट अधिक आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी येथे टेस्ट केलेल्या 20 जणांपैकी केवळ एकचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत होता. (Corona Virus West Bengal)

कोलकाता - कोरोना व्हायरस महामारीमुळे देशातील परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. अनेक राज्यांतील आरोग्य सेवाही मोडकळीस येऊ लागल्या आहेत. कुठे रुग्णांना बेडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर कुठे ऑक्सिजनचा. यातच आता पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणूक काळातच आता पश्चिम बंगालमध्येही कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच राजधानी कोलकात्याचे हाल तर अणखीनच बिघडले आहेत. येथे कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट करणाऱ्या दोन जणांपैकी एक जण पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. तसेच राज्याचा विचार करता चार पैकी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. (Corona Virus kolkata corona cases every second person testing corona positive)

गेल्या महिन्याच्या संख्येचा विचार करता ही संख्या पाच पट अधिक आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी येथे टेस्ट केलेल्या 20 जणांपैकी केवळ एकचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत होता.

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले..

'अजूनही अनेक लोक करेनात कोरोना टेस्ट'-टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरटी-पीसीआर टेस्ट करणाऱ्या लॅबच्या एका डॉक्टरांचे म्हणणे आहे, की ''कोलकाता आणि त्याच्या जवळपासच्या कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅबच्या टेस्टमध्ये 45-55 टक्के पॉझिटिव्हिटी रेट मिळत आहे. तसेच राज्याच्या इतर शहरांत हा स्तर 24 टक्क्यांच्या जवळपास आहे. हे प्रमाण पाच महिन्यांपूर्वी केवळ पाच टक्केच होते.'' तसेच, एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात पॉझिटिव्हिटी रेट याहूनही अधिक आहे. अनेक लोक असे आहेत, त्यांना अगदी हलक्या स्वरुपाचे तसेच अनेकांना तर लक्षनेही नाहीत, असेही रुग्ण आहेत. मात्र, त्यांनी अद्याप तपासणी केलेली नाही. आपण तपासणी वाढविण्याची आवश्यकता आहे.

एका महिन्यात रुग्णांत विक्रमी वाढ -एक एप्रिलला बंगालमध्ये 25,766 जणांची कोरोना टेस्ट झाली होती. यात केवळ 1274 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. हा पॉझिटिव्ह रेट 4.9 टक्के होता. शनिवारी 55,060 लोकांची तपासणी करतण्यात आली, यांपैकी तब्बल 14,281 जण पॉजिटिव्ह असल्याचे दिसून आले. हा दर 25.9 टक्के होता. पियरलेस हॉस्पिटलचे मायक्रोबायोलॉजिस्ट भास्कर नारायण चौधरी यांनी सांगितल्यानुसार, लोकांमध्ये वेगाने संक्रमण होण्यामागे म्यूटेंट व्हायरस आहे. जो, अत्यंत कमी वेळातच अधिकांश लोकांना संक्रमित करत आहे. तसेच या मागचे एक कारण असेही आहे, की ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांपैकी काही लोकच कोरोना टेस्ट करण्यासाठी जात आहेत. 

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

पॉझिटिव्हिटी रेट वाढून 55 टक्क्यांवर -आणखी एका रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले, की आमच्या लॅमबधील पॉझिटिव्हिटी रेट वाढून 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता लोक टेस्टिंग करून घेण्यासाठी समोर येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लवकर आपण कोरोना संक्रमितांना शोधून आयसोलेट करू तेवढे चांगले असेल.

निवडणूक काळात सातत्याने सुरू होता प्रचार -पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडमूक आयोग येथे एकूण आठ टप्प्यांत निवडणूक घेत आहे. त्याचा सातवा टप्पा उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. तत्पूर्वी मतदानाचे अर्धे टप्पे होईपर्यंत येथे सर्वच पक्ष जोरदार रोडशो आणि रॅल्या करत होते. त्यात मोठ्या प्रमाणावर गर्दीही जमत होती. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत गेल्या गुरुवारी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारावर काही बंधने घातली आहेत.

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१