Corona virus : लॉकडाऊन अन् मास्क हा तात्पुरता पर्याय, राहुल गांधींनी सांगितला कायमचा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:27 PM2021-05-28T13:27:45+5:302021-05-28T15:15:36+5:30
Corona virus : आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर अद्याप धोका कायमच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे. कोरोनाच्या या सर्व मुद्द्यांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. कोरोना हा तोंड वर काढणारा आजार आहे, यावर लॉकडाऊन आणि मास्क हा तात्पुरता उपाय आहे. केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.
The Prime Minister's 'nautanki' is the reason behind the second wave of COVID19 in India. He did not understand COVID19. India's death rate is a lie. The government should tell the truth: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/ZmYXsL6d7X
— ANI (@ANI) May 28, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लसीकरण हाच उपाय
कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितलं. त्यामध्ये लस घेणे हा कायमस्वरुपीचा उपाय आहे. लॉकडाऊन हेही हत्यार आहे, पण यामुळे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊन हे तात्पूरते उपाय असून लसीकरण हाच सर्वात प्रभावशाली आणि कायमस्वरुपीचा उपाय असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं.