लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी कोरोनाचे १६७५२ नवे रुग्ण सापडले असून ही गेल्या महिनाभरातील सर्वाधिक संख्या आहे. देशात कोरोनाचे सुमारे १ कोटी ११ लाख रुग्ण असून त्यातील १ कोटी ७ लाख ७६ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी ११३ जणांचा बळी गेला.
गेल्या २९ जानेवारीला कोरोनाचे १८ हजार ८०० नवे रुग्ण आढळले होते. देशात बळींची एकूण संख्या १ लाख ५७ हजार झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचा आकडा १ लाख ६४ हजारपर्यंत वाढला आहे. या रुग्णांचे प्रमाण १.४८ टक्के तर बरे झालेल्यांचे एकूण प्रमाण ९७.१० टक्के झाले आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४२ टक्के आहे. रविवारी कोरोनाचे ११७१८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत १ कोटी ४३ लाख लोकांना लस देण्यात आली.
सहा राज्यांत ८६.३७% उपचाराधीन रुग्णदेशातील उपचाराधीन रुग्णांपैकी ८६.३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचाही समावेश आहे. तर देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सतत वाढती आहे.
७९३५ खासगी केंद्रे कोरोना लसीसाठी देशात कोरोना लस देण्यासाठी ७९३५ खासगी केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्या केंद्रांची राज्यवार संख्या याप्रमाणे आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेची मान्यताnवॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सनच्या केवळ एकाच डोसच्या असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. nया देशात आतापर्यंत तीन लसींना ही परवानगी मिळाली आहे. ही लस फ्रीझरऐवजी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तरी चालवणार असून त्यामुळे साठवणूक करणे अधिक सोपे झाले. nजॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडेल अशी ठेवण्यात येईल. अमेरिकेमध्ये मॉडेर्ना व फायझरच्या या दोन डोसच्या कोरोना लसींना याआधीच आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश (१५४५)तामिळनाडू (८३७)महाराष्ट्र (६५९)गुजरात (६२०)पंजाब (५९७)आंध्र प्रदेश (५४५)झारखंड (४७५)कर्नाटक (४६०)छत्तीसगढ (३७७)केरळ (३७७)हरयाणा (३६७)मध्यप्रदेश (३२३)बिहार (२५३)आसाम (१५४)उत्तराखंड (८४)हिमाचल प्रदेश (६६)दिल्ली (५६)जम्मू-काश्मीर (३४)मेघालय (१७)चंदीगड (१६)नागालँड (१४)गोवा (१३)तेलंगणा (१२)पुडुच्चेरी (११)मणिपूर (९)मिझोराम (५)पश्चिम बंगाल (५)त्रिपुरा (२)अरुणाचल प्रदेश (१)सिक्कीम (१)