कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 57 लाख 07, 637 इतकी झाली आहे. 24 लाख 49, 524 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 52,746 जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारतातील ही आकडेवारी पाहिल्यास रुग्णांचा आकडा 1 लाख 53,230 वर पोहोचली आहे. 64,729 रुग्ण बरे झाले असून 4,365 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कर्मभूमी सोडून प्रत्येक मजूर जन्मभूमीकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दिसेल त्या मार्गानं हे मजूर घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे गाड्या, एसटी बस सोडण्यात येत आहेत. पण, या मधल्या काळात अनेक मजूरांना तहान-भुकेनं किंवा अपघातात जीव गमवावा लागला.
सध्या सोशल मीडियावर असाच एक सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिहारच्या मुजफ्फरपुर येथील हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. मुजफ्फरपुर स्टेशनवर रेल्वेची प्रतीक्षा करता करता तहान-भुकेनं या आईनं आपले प्राण सोडले. चार दिवसांपासून ती या लेकरांसह रेल्वे स्टेशनवर भुकेली राहुन रेल्वेची वाट पाहत आहे. त्यात वाढत्या गर्मीचा मारा आणि त्यामुळे या आईनं प्राण सोडले. ती तिच्या लेकरांना पोरकं करून गेली. पण, या चिमुरड्याला त्याची आई आपल्यात राहिली नाही, हेही माहीत नाही. तो तिच्या पदरासोबत अजूनही खेळत आहे.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा
शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा
Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...
ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद
ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022पर्यंत स्थगित होणार?; ICCच्या सूत्रांची माहिती
... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी!
आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!
India vs Australia : ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं वेळापत्रक, जाणून घ्या टीम इंडिया कधी व कुठे भिडणार