नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा होऊन काही दिवस झाले असतानाच दिल्लीत निजामुद्दीन येथे हजारो तबलिगी राहत असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. दिल्लीतून हे तबलिगी देशातील विविध भागात गेल्याने कोरोनाचा फैलाव करण्यासाठी तबलिगींचे बेजबाबदार वर्तन कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या एक हजार तबलिगींनी कोरोनावर मात केली आहे. या आजारातून बरे झालेल्या तबलिगींना घरी जाऊ द्यावे, तसेच ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये ४ हजारहून तबलिगी वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सर्व तबलिगींची तपासणी केली असता त्यापैकी बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या तबलिगींवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. आता यापैकी एक हजार तबलिगी कोरोनावर मात करून बरे झाले असून, त्यांना घरी जाण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा फैलाव करण्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून तबलिगी जमातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तसेच विविध राज्यांमधील सरकारे आणि प्रशासनानेही कोरोनाच्या फैलावाचे खापर तबलिगींवर फोडले होते. दरम्यान, मरकजचे संचालक मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह
भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १३ ते २४ मार्चदरम्यान झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला सुमारे १६ हजार ५०० तबलिगी पोहोचले होते. दरम्यान, कोरोना संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर या तबलिगींनी देशातील विविध भागात क्वारेंटाईन करण्यात आले होते.