corona virus : संपूर्ण देशात ऑक्सिजनची टंचाई; हे राज्य मात्र रुग्णांची गरज भागवून शेजारील राज्यांना पुरवतेय प्राणवायू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:40 AM2021-04-28T11:40:25+5:302021-04-28T11:43:02+5:30
medical oxygen in India : ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे.
तिरुवनंतपुरम - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. (corona virus in India) वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठीला लागणाऱ्या ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. (medical oxygen in India) ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे. पण दक्षिणेतील केरळमध्ये मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी येथे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन (Oxygen Cylinder) मिळत असून, येथून शेजारील राज्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. (oxygen shortage throughout in India; however Kerala caters to the needs of the patients and supplies oxygen to the neighboring states)
सध्या देशभरात ऑक्सिजनसाठी धावपळ होत असली तरी केरळमध्ये सध्या मौल्यवान ठरत असलेल्या ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत आहे. एवढेच नाही तर गरज पडली तर पुढच्या काळात अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता या राज्याकडे आहे. या घडीची आकडेवारी पाहिल्यास केरळ सध्या दररोज ७० मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि १६ मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला पुरवत आहे. डेप्युटी चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह अँड मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंग चे नोडल अधिकारी डॉ. आऱ वेणुगोपाल यांनी सांगितले की, कोविड केअरसाठी आम्हाला दररोज ३५ मेट्रिक टन ऑक्सिजन आणि नॉन कोविड केअरसाठी दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गजर आहे. आमची एकूण क्षमता १९९ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. तसेच गरज भासल्यास आम्ही आपली उत्पादन क्षमता अधिक वाढवू शकतो.
केरळमध्ये ऑक्सिजनची टंचाई न जाणवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येथे रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र देशातील इतर राज्यांप्रमाणे येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही आहे. दुसरीकडे देशातील इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. ''आम्ही प्राथमिक टप्प्यामध्येच कोरोना रुग्णांचे निदान करण्यात सक्षम आहोत. त्यामुळे आम्ही लवकर उपचार सुरू करण्यात यशस्वी ठरतोय. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन लावायची गरज भासत नाही आहे, असे केरळमधील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मोहम्मद अशील यांनी सांगितले.
आज इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवत असलेल्या केरळमध्ये गेल्यावर्षी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानच केरळने योग्य ती पावले उचलली. जेव्हा देशात कोरोनाचे रुग्णा वाढू लागले तेव्हा डॉ. वेणुगोपाल यांनी सर्व बल्क प्लँट्स आणि मेडिकल ऑक्सिजन निर्मात्यांना पत्र लिहून उत्पादन वाढवण्याची सूचना केली. त्यामुळे हे संकट वाढण्याआधीच केरळमधील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढले.