शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, ८ राज्यांमध्ये 'R' फॅक्टर अधिक; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 6:34 PM

Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे.

Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या १८ जिल्ह्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ४७.५ टक्के रुग्ण आहेत. केरळमधील १० जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यात ४०.६ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Corona virus second wave is still not over, R number is high in 8 states says Lav Agarwal)

देशात १० मे रोजी ३७ लाख सक्रीय रुग्ण होते त्यात आज घट होऊन ४ लाखांवर संख्या आली आहे. देशातील एका राज्यात सध्या १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर ८ राज्य अशी आहेत की जिथं सध्या १० हजाराहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर २७ राज्यांमध्ये १० हजारापेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशात १ जून रोजी २७९ जिह्ल्यांमध्ये दर दिवशी १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. पण असे जिल्हे आता कमी होऊन ५७ वर आले आहेत. २२२ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीवर ब्रेक लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

४४ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दरदेशात सध्या ४४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे आणि अजूनही लढाई संपलेली नाही. भारतात अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. देशात R फॅक्टर म्हणजेच रिप्रोडक्शनचा वापर करुन वाढीचा दर आणि सक्रीय रुग्णांचा अभ्यास करण्यात येतो. यातून देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही हे लक्षात येतं, असंही लव अग्रवाल म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस