नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर कायम असून, गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून, गेल्या तीन ते चार दिवसांतील हा सलग मोठा आकडा असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसत असून, गेल्या १.३१ लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (corona virus update india reports 131968 new corona cases and 780 deaths in the last 24 hours)
गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येनं लाखांचा टप्पा पार केलेला पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ९६८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, ७८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता
अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांजवळ
देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल ९ लाख ७९ हजार ६०८ झाला असून, रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३० लाख ६० हजार झाली असून, १ कोटी १९ लाख १३ हजार २९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ६७ लाख ६४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशभरात आतापर्यंत ९ कोटी ४३ लाख ३४ हजार २६२ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
गुरुवारी कोणत्या राज्यात आढळले किती रुग्ण?
महाराष्ट्र : ५६ हजार २८६दिल्ली : ७ हजार ५३७उत्तर प्रदेश : ८ हजार ४७४कर्नाटक : ६ हजार ५७०
रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास १५ एप्रिल उजाडणार
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन ते तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. पात्र लाभार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन करत अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.