देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या करोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणासंबंधी तयारींची माहिती घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोज करण्यात आलं होतं. यासोबत केंद्र सरकारनं देशभरात लसीकरणआच्या तारखेचीही घोषणा केली. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरूवातीला कोणाला दिली जाणार याचा प्राधान्यक्रम सरकारनं तयार केला आहे. सुरूवातील ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींना आणि त्या पश्चात त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना ज्यांना कोणता गंभीर आजार आहे त्यांना ही लस दिली जाईल. देशात अशा लोकांची संख्या ही २७ कोटींच्या जवळपास आहे.
सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात
By जयदीप दाभोळकर | Published: January 09, 2021 4:58 PM
काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास सरकारनं दिली होती परवानगी
ठळक मुद्देसरकारनं ठरवला प्राधान्यक्रमपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली उच्चस्तरीय बैठक