देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारनं जाहीर केलं. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच यावेळी पहिल्या ३ कोटी लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. "आपल्याला लोकांना जागरूक करत राहावंच लागणार आहे. हेच काम कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही करावचं लागमार आहे. या लसीकरणावर वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारत काम करत राहणार आहोत आणि आपण त्याच दिशेने पुढे जात आहोत," असं मोदी यावेळी म्हणाले.
पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : पंतप्रधान
By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 5:25 PM
१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला होणार सुरूवात
ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून होणार लसीकरणाला सुरूवातपंतप्रधानांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद