दिल्लीः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. इटली आणि इस्रायलसारख्या देशांनीही कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक पाऊल दूर असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरात कोरोनावर लस तयार करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. या दोन्ही संस्था कोरोनावरची लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅबमधून कोरोना व्हायरस स्ट्रेन्स भारत बायोटेकला पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लस तयार झाल्यानंतर प्रथम तिची चाचणी प्राण्यांवर केली जाणार आहे.प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मानवांवर त्याचा प्रयोग केला जाईल. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'लसपासून औषधाच्या शोधापर्यंत आयुष मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिंबा देत असून, स्वतः महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारताच्या इतिहासात प्रथमच आयुषच्या काही औषधांविषयी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. येणार्या काळात हे एक ऐतिहासिक पाऊल असू शकते. भारतातही लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्यालिपुलेख-मानसरोवर लिंक रोड तयार; चीनवर भारी पडणार भारतीय लष्कर
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका
CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक